वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संरक्षण खात्यातील संशोधकांनी एक आगळा-वेगळा असा उडणारा ग्रेनेड तयार केला असून शत्रूच्या प्रदेशात या ग्रेनेड ने प्रवेश करताच रिमोट कंट्रोल चा वापर करून स्फोट घडविणे शक्य होणार आहे.
या ग्रेनेड ला एखादा हेलिकॉप्टर प्रमाणे पंख असून तो 20 किलोमीटर अंतरापर्यंत उडू शकतो सर्वसाधारण पणे ग्रेनेड चा वापर करताना सैनिक त्याची पिन काढून तो फेकतात आणि नंतर त्याचा स्फोट होतो पण संशोधकांनी शोधलेल्या या आगळ्यावेगळ्या उडणाऱ्या ग्रेनेड मुळे भविष्यामध्ये युद्धाची परिभाषाच बदलली जाणार आहे.
या ग्रेनेडला चार पाती असून त्यांच्या वेगामुळे तो नियोजित ठिकाणी जाऊ शकतो आणि जर नियोजित ठिकाणी स्फोट घडवून आणणे शक्य झाले नाही तर हा ग्रेनेड पुन्हा एकदा मूळ ठिकाणी परत येतो ही सर्व कामे रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने केली जातात अमेरिकेचा लष्कराने नॉर्थ कॅरोलिना च्या एका कॅम्पमध्ये गेल्या आठवड्यात या ग्रेनेड ची यशस्वी चाचणी केली हा प्रकारचा ड्रोन बॉम्ब असून फक्त त्याचा आकार खूप लहान आहे.
ड्रोनच्या साहाय्याने जेव्हा स्फोट घडवला जातो तेव्हा ड्रोन तो बॉम्ब वाहून नेतो आणि नंतर बॉम्ब टाकला जातो नंतर त्याचा स्फोट होतो पण या ठिकाणी मात्र ग्रेनेड चा स्फोट रिमोट कंट्रोल चा सह्याने केला जाणार आहे आगळ्यावेगळ्या ग्रेनेडला ड्रोन फोर्टी असे नाव देण्यात आले आहे.
अशा प्रकारचा ग्रेनेड बनवण्याची कल्पना ऑस्ट्रेलियाच्या लष्कराची आहे आणि इराकमध्ये तैनात असलेल्या ऑस्ट्रेलियन सैनिकांना नेहमीच दूरवर मारा करण्याबाबत समस्या येत होत्या त्यावेळेस त्यांच्या डोक्यात अशा प्रकारच्या ग्रेनेड चा शोध लावावा असे विचार समोर आले होते आणि ते आता प्रत्यक्षात आले आहेत.