मुंबई : मराठा आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय चर्चा सुरु आहेत. यातच आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने दि. १७ जून रोजी बैठक घेतली.
या बैठकीत समाजाच्या मागण्या शासन स्तरावर मान्य करण्यात आल्या. त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने कालावधी मागितला होता. मात्र एक महिना पूर्ण होऊनदेखील प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपसमितीच्या सदस्य मंत्र्यांना पत्र लिहिलं असून आपली नाराजी जाहीर केली आहे. संभाजीराजेंनी ट्विटरला हे पत्र शेअर केलं आहे.
काय आहे संभाजीराजेंचे ट्विट
….अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू ! मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने दि. १७ जून रोजी बैठक घेतली. या बैठकीत समाजाच्या मागण्या शासनस्तरावर मान्य करण्यात आल्या. त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने कालावधी मागितला होता.
….अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू !
मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने दि. १७ जून रोजी बैठक घेतली. या बैठकीत समाजाच्या मागण्या शासनस्तरावर मान्य करण्यात आल्या. त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने कालावधी मागितला होता.
(१/२) pic.twitter.com/DKHP04KjKw
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 15, 2021