मंचर -आंबेगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 411 वर पोहोचली आहे. शनिवारी (दि. 8) या एकाच दिवसात 7 बाधित रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली. गंगापूर बुद्रुक येथे दोन, घोडेगाव येथे एक, खडकवाडी तीन, मंचर येथे एक, असे एकूण 7 बाधित रुग्ण एकाच दिवसात सापडले आहेत. रुग्णांची एकूण संख्या 411 इतकी झाली आहेत.
बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.नागरिकांनी मास्कचा वापर करावा; अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे.