मंचर – आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांत बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तींमुळे करोनाचे पाच रुग्ण सापडले आहेत.
त्यामुळे संपूर्ण दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेला तालुका हळूहळू रेड झोनकडे मार्गक्रमण करीत असल्याने प्रशासन हाय अलर्ट झाले असून उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. तरी नागरिक बिनबोभाटपणे फिरत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. तर धोका अद्याप संपलेला नसून तो केव्हाही आपल्याला कवेत घेईल हे या बिनबोभाटपणे फिरणाऱ्यांना समजाऊन सांगणार तरी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.