Ambati Rayudu : अलीकडेच भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू राजकारणात आला होता. अंबाती रायुडू आंध्र प्रदेशच्या युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टी (YSRCP) मध्ये सामील झाला होता. पण अवघ्या काही दिवसांनी त्याने आपल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. वास्तविक, अंबाती रायडू राजकारणातून ब्रेक घेण्याबाबत बोलला. तथापि, अंबाती रायडूने आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी YSRCP पक्ष सोडण्याचा आणि काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर रायडूने इतक्या लवकर राजकारणातून युटर्न का घेतला असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असतानाच रायडूने स्वतः त्याच उत्तर सांगितलं आहे.
अंबाती रायडूने का सोडले राजकारण?
राजकारणातून ब्रेक घेण्याचा निर्णय अंबाती रायडूने का घेतला याविषयी त्याने रविवारी 7 जानेवारी रोजी स्वतः ट्विट करत याचे कारण स्पष्ट केले. तो म्हणाला, मी अंबाती रायुडू येत्या 20 जानेवारीपासून दुबई येथे होणाऱ्या ILT20 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. यासाठी मला व्यावसायिक खेळ खेळताना राजकारणापासून अलिप्त राहणे आवश्यक आहे. याकरता मी संबंधित निर्णय घेतला आहे”. वास्तविक, अंबाती रायुडूच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्याने अवघ्या 8 दिवसांपूर्वीच राजकारणात प्रवेश केला होता.
I Ambati Rayudu will be representing the Mumbai Indians in the upcoming ILt20 from jan 20th in Dubai. Which requires me to be politically non affiliated whilst playing professional sport.
— ATR (@RayuduAmbati) January 7, 2024
दरम्यान, अंबाती रायुडू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. वास्तविक, अंबाती रायुडू UAE लीग ILT20 मध्ये खेळणार आहे. अंबाती रायुडू या लीगमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे अंबाती रायडूने ही पोस्ट केली आहे.
ILT20 चे वेळापत्रक काय आहे?
मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने साऊथ आफ्रिका टी 20 लीग आणि यूएईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय टी 20 लीगमध्ये गुंतवणूक केली आहे. आंतरराष्ट्रीय टी 20 लीगमध्ये त्यांच्या टीमचे नाव एमआय एमिरेट्सने (MI Emirates) असे आहे. ILT20 19 जानेवारीपासून सुरू होत आहे. तथापि, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी एमआय एमिरेट्स 20 जानेवारी रोजी दुबई कॅपिटल्स विरुद्ध पहिला सामना खेळेल. या स्पर्धेत 6 संघ असतील, तर मोसमात एकूण 34 सामने खेळवले जाणार आहेत. ILT20 चा अंतिम सामना 17 फेब्रुवारीला होणार आहे. अंबाती रायुडू व्यतिरिक्त एमआय एमिरेट्सकडे किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, ट्रेंट बोल्ट, कोरी अँडरसन आणि कुसल परेरासारखे खेळाडू असतील.