कोल्हापूर: कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची आज यमुनाष्टक रूपात पूजा आज बुधवार नवरात्रौत्सवाचा चौथा दिवस. आज श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची यमुनाष्टक रूपात पूजा बांधण्यात आली आहे.
निळ्या रंगाची साडी परिधान केलेली आई अंबाबाई कासवावर विराजमान झाली आहे. देवीच्या एका हातात कलश असून, उजव्या हाताने ती भक्तांना आशिर्वाद देत आहे. नवरात्रौत्सवाची आज चौथी माळ म्हणजेच चौथा दिवस. गेले तीन दिवस आई अंबाबाईच्या लाखो भाविकांनी श्री अंबाबाईच्या दर्शनाचा लाभ घेतला. नवरात्रीच्या नउ दिवसांमध्ये कोल्हापूरच्या अंबाबाईची विविध स्वरूपात पूजा बांधली जाते.
ही पूजा आणि देवीचे नवरात्रीतील वैभवशाली आणि तेजस्वी रूप पाहणे हे भक्तांसाठी पर्वणीच असते. दरम्यान आज चौथ्या दिवशी देवीची यमुनाष्टक रूपात आकर्षक पूजा बांधण्यात आली. आदि शंकराचार्यांनी रचलेले यमुनाष्टक म्हणजे यमुनेची स्तुती. त्यांच्या तीर्थयात्रेच्या काळात त्यांनी ही यमुनेची आठ श्लोकांमध्ये स्तुती रचली असावी. गंगेप्रमाणेच यमुनेलाही हिंदु धर्मात वेगळे महत्व आहे. कृष्णचरित्राशी यमुनेचा घनिष्ट संबंध आहे.
श्रीकृष्णाच्या महत्वाच्या लीलांची यमुना नदी साक्षी आहे. कालांतराने कृष्णसंप्रदायामध्ये यमुनेचे दैवत्व वाढीला लागून तीला समूर्त करण्यात आले. कालांतराने कृष्णसंप्रदायामध्ये यमुनेचे दैवत्व वाढीला लागुन तीला समूर्त करण्यात आले. जसे गंगेचे वाहन मगर तसे मकर तसे यमुनेचे वाहन कासव मानले जाते.