अमरनाथ यात्रा एक दिवसासाठी स्थगित

जम्मू – हिज्बुल मुजाहिदीनचा ठार झालेला कमांडर बुऱ्हाण वानी याच्या तिसऱ्या स्मृतीनिमीत्त या संघटनेने सोमवारी एक दिवसांचा बंद पुकारला होता. त्यामुळे या काळात काहीं आक्षेपार्ह घटना घडू नये म्हणून दक्षतेचे उपाय योजण्यात आले. त्यानुसार अमरनाथ यात्रा सोमवारी एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली होती.

उद्या मंगळवार पासून ही यात्रा पुन्हा सुरू होईल अशी माहिती संबंधीत अधिकाऱ्यांनी दिली. आज भगवतीनगर कॅम्पपासून अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची वाहने सोडण्यात आली नाहीत. 30 जून पासून ही यात्रा सुरू झाली आहे. आत्तापर्यंत भगवतीनगर कॅम्प पासून 36 हजार 309 भाविक यात्रा मार्गावर सोडण्यात आले आहेत. आत्ता पर्यंत सुमारे 95 हजार भाविकांनी अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन घेतले. आज सोमवारच्या बंदचा भाविकांवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.