पुणे – अन्वीत राजवाडे, कबीर देसाई, गौतम साठे यांनी योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून ११ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे.
या स्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या दुसऱ्या फेरीत अन्वीत राडवाडेने ओजस काळेवर २१-८, २१-१० अशी, तर कबीर देसाईने रावीश आपटेवर २१-१७, २१-१६ अशी मात केली. गौतम साठेने साथ्यान तिरुवेंकटेश्वरणचे आव्हान १६-२१, २१-१३, २१-१३ असे परतवून लावले. यानंतर लक्ष्य सिन्हाने ऋग्वेद रासनेवर २१-५, २१-१० असे, बुरहनुद्दीन अगाशीवालाने साहीर तुरम्बेकरवर २१-५, २१-४ अशी मात केली.
Amanora PYC-HTBA Cup : बॅडमिंटन स्पर्धेत मिहिका, शौर्याचे विजय…
स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या दुसऱ्या फेरीत तेजस्वी भुतडाने अवनी हरडेवर २१-७, २१-१० अशी, रीत पालने चार्वी लापसीयवर २१-५, २१-८ अशी मात केली. यानंतर कायरा रैनाने स्पृहा गांधीवर २१-५, २१-६ असा, तर पलक धनगरने प्रिशा पटवर्धनवर १७-२१, २१-१५, २१-१८ असा विजय मिळवला. स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या सलामीच्या लढतीत आयुषी काळेने ए. परमारवर २१-९, २१-७ अशी, तर जुई जाधवने साची संचेतीवर २१-११, २१-१० अशी मात केली.