IND vs AUS Final – भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Final) यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stedium) होणार आहे. दोन्ही संघ 20 वर्षांनंतर अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.
गेल्या वेळी 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला (India Vs Australia) हरवून विजेतेपद पटकावले होते. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये 1.25 लाख प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. त्याच्याशिवाय अनेक सेलिब्रिटी येण्याची शक्यता आहे. (WorldCup 2023)
दरम्यान, उद्या हा हायव्होल्टेज ड्रामा रंगणार असून या सामन्यापूर्वी काही खास शोचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ल्ड कपच्या मॅचच्या आधी एक एअर शो (Air Show) होणार आहे. इंडियन एअरफोर्सने या शोचं आयोजन केलं आहे. त्यासाठी दुपारी 1.30 पासून 1.50 ची वेळ देण्यात आली आहे.
त्याआधी टॉस होणार आहे. एअर शो नंतर दोन्ही टीमचे राष्ट्रगीत होतील. नंतर दोन वाजता सामन्याची सुरुवात होईल. त्यानंतर 10 मिनिटांचा एअर शो दाखवण्यात येईल.
पहिल्या इनिंगमधील ड्रिंक्स ब्रेकदरम्यान ‘खलासी’ या ट्रेंडिंग गाण्याचा गायक आदित्य गधवी परफॉर्म करणार आहे. जवळपास दुपारी 3 वाजता हा शो होईल. तर ब्रेकदरम्यान प्रीतम, जोनिता गांधी, नक्श अजीज, अमित मिश्रा, अकासा सिंह आणि तुषार जोशी यांचेही परफॉर्मन्स पहायला मिळतील.
मॅचच्या दुसऱ्या इनिंगच्या ड्रिंक्स ब्रेकदरम्यान लेजर आणि लाइट शो होणार आहेत. वर्ल्ड कप 2023 मध्ये पहिल्यांदा लेझर शो होणार आहे. मॅच झाल्यानंतर चॅम्पियन्सला सलामी देण्यासाठी ड्रोन शो आयोजित करण्यात आला आहे. यासाठी तब्बल 1200 ड्रोन वापरण्यात येणार आहेत.