मुंबई – बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत आहेत. ‘शेरशाह’ रिलीज झाल्यापासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराच्या जोडीबाबत त्यांचे फॅन्स खूपच एक्साईटेड आहेत. ‘शेरशाह’मध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कारगिल युद्धातील हिरो कॅप्टन विजय बत्रा यांचा रोल केला होता.
तर कियारा आडवाणी विक्रम बत्रा यांची गर्लफ्रेंड ‘डिंपल चीमा’च्या रोलमध्ये दिसली होती. आता सिद्धार्थ आणि कियारा या दोघांच्या लग्नाच्या प्लॅनची घोषणा झाली असून, लवकरच हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारीला कियारा आणि सिद्धार्थ यांचे लग्न राजस्थानमध्ये असून सध्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. अत्यंत राॅयल पध्दतीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. 100 ते 150 अत्यंत जवळच्या लोकांमध्ये हा विवाह सोहळा पार पडेल.
आज पासून म्हणजेच, 3 फेब्रुवारीपासून लग्नाच्या कार्यक्रमांना सुरूवात होईल. अमिताभ बच्चन, करण जोहर, शाहिद कपूर आणि त्याची बायको मीरा, ईशा अंबानी, वरूण धवन हे लग्न सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नापूर्वीचे कार्यक्रम, लग्न आणि लग्नानंतरचे रिसेप्शन हे 5 फेब्रुवारीपासून ते 8 फेब्रुवारीपर्यंत पार पडणार आहेत. मेहंदी, हळद आणि संगीत हे कार्यक्रम 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहेत. तर 6 फेब्रुवारीला जैसलमेरमधील ‘सूर्यगढ पॅलेस’मध्ये शाही थाटामध्ये दोघे लग्न करणार आहेत. या पॅलेसचे एका दिवसाचे भाडे हे 1 ते 2 कोटी आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील फेमस लव्ह बर्ड्स मानले जाते. दोघांना अनेकदा पार्टी आणि कॅफेमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवताना कॅमेऱ्यात टिपण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून दोघांच्या लग्नाची सुरू असून दोघेही लवकरच लग्नबंधणात अडकणार आहेत. अर्थात दोघांनी अधिकृतरित्या याची माहिती दिलेली नाही.