मुंबई: नव्या मंत्रिमंडळाच्या सत्ता स्थापनेनंतर आता मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप सुरु झाले आहे. तूर्तास चार मंत्र्यांना बंगले मिळाले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना “वर्षा’ बंगला मिळाला आहे. तर छगन भुजबळ यांना रामटेक, जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले मिळाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेत्याचा बंगला मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांना सागर हा बंगला मंजूर झाला आहे. हा बंगला मलबार हिल परिसरातच आहे. माजी कृषीमंत्री अनिल बोंडे हे सागर या निवासस्थानी वास्तव्यास होते.