नवी दिल्ली – आर्थिक वर्ष 2021-22 च्या सुधारित अर्थसंकल्पीय वाटपानुसार सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 या योजनेसाठी 19999.55 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून हा निधी ,आर्थिक वर्ष 2020-21 च्या 17902.31 कोटी रुपये या सुधारित अर्थसंकल्पीय वाटपापेक्षा 11.71% अधिक आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे आयोजित राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अंतर्गत 5 वर्षांखालील कमी वजनाच्या, अपोषित आणि गंभीरपणे कुपोषित असलेल्या मुलांची अंदाजे संख्या सर्वेक्षण करून प्राप्त केली जाते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अलीकडील (2019-21)अहवालानुसार, (2015-16) या वर्षाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या तुलनेत 5 वर्षाखालील मुलांचे पोषण निर्देशांक सुधारले आहेत.
मुलांचे वाढ खुंटण्याचे प्रमाण 38.4% वरून 35.5% पर्यंत कमी झाले आहे, तर कुपोषित होण्याचे प्रमाण 21.0% वरून 19.3% आले आहे आणि वजन कमी असण्याचे प्रमाण 35.8% वरून 32.1% पर्यंत कमी झाले आहे.
ही माहिती केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती झुबिन इराणी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.