पिंपरी, दि. 27- भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी (दि. 26) भोसरीतील इंद्रायणीथडीला भेट दिली. रात्री उशिरापर्यंत विविध कार्यक्रमांचा त्यांनी आनंद घेतला. मनोरंजनाच्या कार्यक्रमस्थळी त्यांनी गीत गायनही केले. तसेच, महोत्सवातील सुमारे 400 स्टॉलला प्रत्यक्ष भेट दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला बचतगटांच्या प्रतिनिधींची आस्थेने विचारपूस करत आयोजनकांना काही सूचनाही केल्या. यासह स्टॉलवरील उत्पादनाचा आस्वादही घेतला.
यावेळी त्या म्हणाल्या, महिला बचत गटसारखी संकल्पना ज्यातून “चूल आणि मुल’ या संकल्पनेच्या बाहेर येऊन राज्यातील महिला सक्षम होतांना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याला बळ देण्याचे काम “इंद्रायणी थडी” यात्रेमधून आमदार महेश लांडगे यांनी केले. त्यामुळे राज्यातील सर्व मातृशक्ती लांडगे यांच्या पाठीशी आहे, असे गौरवोद्गार वाघ यांनी काढले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून “नारी शक्तीचा’ सन्मान केला जात आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंद्रायणी थडी महोत्सवाची सुरूवात झाली. त्याचा मला आनंद होत आहे. देशातील पंतप्रधान मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार महिलांना सुरक्षित ठेवण्याचे काम करीत आहे. त्यामुळेच या मातृशक्तीचं कौतुक, गौरव करण्याचे काम महेश लांडगे करीत आहेत, असेहीत्या म्हणाल्या.
यावेळी शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांच्या हस्ते त्यांचा प्रभू श्रीराम मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.