ऑल इंग्लंड बॅडमिंटन : सायनासाठी खडतर तर, सिंधूसाठी सोपा ड्रॉ

लंडन – भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला आगामी ऑल इंग्लंड अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेत सोपा ड्रॉ मिळाला आहे. अनुभवी सायना नेहवालला मात्र, पहिल्या फेरीतच कडव्या प्रतिस्पर्धीचा सामना करावा लागणार आहे.

टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ही स्पर्धा 17 ते 21 मार्चदरम्यान होणार असून ऑलिम्पिक रजतपदक विजेत्या सिंधूची पहिल्या फेरीत मलेशियाच्या सोनिया चियाशी लढत होणार आहे. सिंधूने अपेक्षेनुसार कामगिरी केल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिला अकाने यामागुची तर, उपांत्य फेरीत कॅरिलोना मारिनचा सामना करावा लागेल.

सायनासमोर मात्र, डेन्मार्कच्या मिआ ब्लिचंफेल्डचे आव्हान असेल. पुरुष एकेरीत पी. कश्‍यपला पहिल्याच फेरीत क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जपानच्या केन्टो मोमोटाविरुद्ध लढत द्यावी लागणार आहे.

किदम्बी श्रीकांतचा सलामीचा सामना इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआटरेशी होईल तर, एच. एस. प्रणॉयलचा मलेशियाच्या ल्यू डॅरेनशी सामना करावा लागेल. ऑल इंग्लंड स्पर्धेपूर्वी येत्या 3 मार्चपासून स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची कामगिरीदेखील ऑलिम्पिक पात्रतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.