लंडन – भारतासाठी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. महिलांच्या दुहेरीत चमत्कार घडवताना गायत्री गोपीचंद व ट्रीसा जॉली या जोडीने थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता या जोडीसाठी देशासाठी पहिलेच विजेतेपद प्राप्त करणे केवळ दोन पावलांवर आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत गायत्री व ट्रीसा या जोडीने चीनच्या ली वॅन वेन मेइ व लियु झुआन झुआन या जोडीवर 21-14, 18-21 व 21-12 असा तिन गेममध्ये विजय मिळवला.
#INDvAUS 1st ODI : राहुल भरात, जडेजाही जोरात; भारताचा 5 गडी राखून विजय
गायत्री व ट्रीसा जोडीने पहिली गेम सहज जिंकली. मात्र, चीनच्या जोडीने पुढील गेम जिंकत सामन्यात रंगत निर्माण केली. यावेळी गायत्री आणि ट्रीसाने अफलातून स्मॅश केले तसेच बिनतोड सर्व्हिस करत चीनच्या जोडीला निष्प्रभ केले आणि निर्णायक गेम जिंकत सामनाही जिंकला. भारताच्या या जोडीने सलग दुसऱ्यावेळी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.