Tiger Woods car crash | टायगर वूड्‌सवर झाल्या तब्बल दहा शस्त्रक्रिया

लॉस एंजलिस -अपघातात पायाला दुखापत झालेल्या गोल्फपटू टायगर वूड्‌स याच्यावर तब्बल दहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्याची प्रकृती सुधारत असली तरीही त्याच्या कारकीर्दीवर प्रश्‍नचिन्हही निर्माण झाले आहे.

व्यावसायिक गोल्फपटू संघटनेतर्फे (पीजीए) आयोजित होणाऱ्या पुढील स्पर्धांमधील वूड्‌सचा सहभागही आता धोक्‍यात आला आहे. येथे झालेल्या अपघातामुळे वुड्‌सच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापती झाल्या असून त्याचे स्पर्धात्मक पुनरागमन आता कठीण मानले जात आहे.

45 वर्षीय वूड्‌सवर गुरूवारी 10 वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या गंभीर अपघातातून वुड्‌स बचावल्याने गोल्फविश्‍वाला दिलासा मिळाला असला तरीही त्याची कारकीर्द जवळपास संपुष्टात आल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.