बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट ही कोणत्या-न-कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. आलिया भट्टने कमी वयातच चित्रपटसृष्टीत मोठा पल्ला गाठला आहे. आलियाने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मोठी प्रसिद्धी मिळविली आहे. त्यातच तिच्यातील आणखी एक टॅलेंट पाहून चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.
सध्या तिचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. यात ती थरारक शारीरिक कसरत करताना दिसत आहे. या व्हिडिओत आलिया भट्ट ही एका स्टेज शोमध्ये शिल्पा शेट्टीसमोर आपले टॅलेंट दाखविताना दिसते. यात ती सर्वप्रथम आपले हात मोडत एक योगा पोज करताना दिसते. यातील आलियाच्या शरीराची लवचिकता पाहून शिल्पा अचंबित होते. हा व्हिडिओ “बॉलीवूड फिन्डर’ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखाहून अधिक व्हूज मिळाले आहेत. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आलियाचा नुकताच “सडक-2′ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु हा चित्रपट सुपरफलॉप ठरला होता.
आता ती आगामी “ब्रह्मास्त्र’मधून पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यात तिच्यासोबत रणबीर कपूरने मुख्य भूमिका साकारली आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.