प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांच्या पावलावर पाऊल टाकून आता आलिया भटदेखील हॉलीवूडला निघाली आहे. तिने आपल्या पहिल्या हॉलीवूड प्रोजेक्टची घोषणा केली आहे.
विल्यम मॉरिस एंडेव्हरच्या एका सिनेमात काम करण्यास आलियाने होकार दिला आहे, असे समजते आहे. या सिनेमाशी संबंधित काही चर्चा काही दिवसांपूर्वीपर्यंत सुरू होती. लवकरच आलिया या सिनेमाच्या करारावर स्वाक्षरी करण्याचीही शक्यता आहे.
या हॉलीवूड प्रोजेक्टचा कोणताच तपशील अद्याप समजू शकलेला नाही. हॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी आलिया बऱ्याच दिवसांपासून अनेक स्क्रिप्ट वाचत होती. त्यातील एक स्क्रिप्ट तिला खूप आवडली. हा तोच सिनेमा असण्याची शक्यता आहे.
स्वतः आलिया पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला या सिनेमाची घोषणा करण्याची शक्यता आहे. हॉलीवूडमधील कामाच्या प्राधान्यक्रमामध्ये आलियाने जेनिफर लॉरेन्सबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आलियाने हॉलीवूडमधील ज्या एजन्सीबरोबर टायअप केले आहे, त्या एजन्सीबरोबर गल गडोट, ऑपेरा विन्फ्रे आणि चार्लीज थेरॉनसारख्या अभिनेत्रींही संलग्न आहेत. त्यामुळे आलियाला जो प्रोजेक्ट मिळेल तो अगदी हाय प्रोफाईल असेल, हे नक्की आहे.