आळंदी,(वार्ताहर) – महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दल शाखा भाजी मंडई आळंदीच्या वतीने माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. ज्या महिलांनी आपला संसार सांभाळून समाजामध्ये आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटविलेल्या मालन पाटोळे, लता तौर, रुक्मिणी मोरे, सोनाली रत्नपारखी, राजाबाई संकट या महिलांचा जयंतीच्या निमित्त विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन आळंदी शहर महिला आघाडी कल्याणी बवले, सुनिता ढुबे, मंगल कोळी, सपना काळे, सारिका दौंडकर, वृषाली अडवळे, कांचन थोरवे, सीमा मिटकरी, काजल धोंडगे, सलमा मुलानी, रूपाली मुंडे, भाजी मंडई शाखा अश्विनी जाधव, सीता चौधरी, रुक्मिणी तिडके, सपना येलकर, सुलोचना ढोकणे,माधुरी बारवकर, वैशाली तगडपलेवार, कार्यक्रमाचे नियोजन भाजी मंडई शाखा निलेश ढोकणे, संतोष बवले, रितेश नितनवरे, नितीन भुजबळ, प्रज्योत सानप, तुकाराम बोडरे, विशंभर गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी केले.