अक्षय कुमार नेहमीच सोशल मिडीयावर काही पॉझिटिव्ह गोष्टी शेअर करत असतो. आपल्या सिनेमाव्यतिरिक्त काही विधायक गोष्टींनाही तो प्रसिद्धी देत असतो. अक्षयने आपल्या सोशल मिडीयाच्या अकाउंटवर एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. मुलगी निताराबरोबर तो मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता. फिरता फिरता निताराला तहान लागली आणि पाणी पिण्यासाठी हे दोघे रस्त्यातल्या एका झोपडीमध्ये घुसले. त्या घरामध्ये अतिशय गरीब आणि वृद्ध दाम्पत्य होते.
त्यांनी अक्षयच्या मुलीला पाणी तर दिलेच, पण त्याबरोबर तिला गुळ रोटीही दिली. नुसते पाणी देऊ नये, म्हणून या वृद्ध दाम्पत्याने निताराला गुळ रोटी दिली. नितारा या पाहुणचारामुळे जाम खूष झाली. एखाद्याला मदत करण्यासाठी श्रीमंत असायला लागत नाही, तर मनाची श्रीमंती असायला लागते. हा अतिशय मौल्यवान धडा आपल्या लेकीला या अनुभवातून मिळाला, असे अक्षयने आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे. त्याने आपल्या पोस्टबरोबर म्हाताऱ्या दाम्पत्याचे फोटोही शेअर केले आहेत.
अक्षय सध्या शिलिम गावामध्ये मस्त सुट्टी एन्जॉय करतो आहे. त्याचा “हाऊसफुल्ल 4′ नुकताच रिलीज झाला आहे आणि आतापर्यंत या सिनेमाने 109 कोटी रुपयांचा धंदाही केला आहे.