क्रिती सेननच्या आगामी “मिमि’चे शुटिंग राजस्थानमध्ये सुरू झाले आहे. हा एक महिलाप्रधान सिनेमा आहे. हा सिनेमा म्हणजे आपल्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरू शकतो, असे क्रिती मानते आहे. या सिनेमामध्ये क्रितीला मध्यवर्ती रोल आहे अणि सिनेमाची कथा तिच्याच अवतीभोवती फिरत राहते.
या रोलबद्दल बोलताना क्रिती थोडी उत्साही आणि थोडी नर्व्हसही झाली. हा रोल आव्हानात्मक आहे, त्यामुळे जबाबदारी वाढल्याची जाणीव तिला झाली आहे. त्याचबरोबर अजून खूप शिकणे बाकी आहे, हे देखील तिच्या ध्यानात आले, त्यामुळे ती नर्व्हसही झाली आहे.
“मिमि’च्या निमित्ताने क्रिती पुन्हा एकदा “लुक छिपी’चे डायरेक्टर लक्ष्मण उत्तेकर आणि सहकलाकार पंकज त्रिपाठी यांच्याबरोबर काम करते आहे.
क्रितीचा “हाऊसफुल्ल 4′ तुफान चालला आहे. या सिनेमाने थोड्याच दिवसात 100 कोटींचा टप्पा पार केला म्हणून क्रितीने आपल्या फॅन्सना धन्यवाद दिले आहेत.
या सिनेमाबाबत विश्लेषकांनी फारसे चांगले लिहीले नव्हते, त्रिही अक्षय कुमारचा सिनेमा म्हणून प्रेक्षक आवर्जुन थिएटरमध्ये सिनेमा बघायला आले आहेत, याचा आपल्यला आनंद होतो आहे, असेही क्रितीने म्हटले आहे.