नवी दिल्ली : देशभर खळबळ उडवणाऱ्या 2012 मधील निर्भया बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणात आरोपी अक्षय कुमारने पुन्हा एकदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला आहे. या आरोपींना तीन मार्च रोजी पहाटे फासावर लटकवण्यात येणार आहे.
या आधी दाखल केलेल्या अर्जात सर्व वस्तुस्थितीचा उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे हा नवा अर्ज दाखल केला आहे, असे त्याने या अर्जात म्हटले आहे. त्यांच्यासाठी तीन मार्च रोजी पहाटे तीन वाजता फासावर लटकवावे, असे डेथ वॉरंट दिल्ली न्यायलयाने काढले आहे.
मुकेश, विनय आणि आकाश या आरोपींचा दयेचा अर्ज यापुर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निकालात काढला आहे. त्याविरोधात मुकेश आणि विनय यांनी दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायलयाने यापुर्वी फेटाळल्या आहेत.