विनय शर्माने जेल अधिक्षकांना भेट दिले पेंटिंग
नवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील आरोपींपैकी मुकेशसिंह नावाच्या आरोपीने फासावर लटकले जाण्यापुर्वी आपले अवयव दान करावेत अशी सुचना कारागृहातील अधिकाऱ्यांना केली. तर विनय शर्माने त्याने कारागृहात काढलेली काही चित्रे कारागृह अधिक्षकांना भेट दिली. त्याच्या कडील हनुमान चालीसाची प्रत त्याने आपल्या कुटुंबियांना द्यावी अशी सुचना केली. विनयला कारागृहात असताना चित्रे काढण्याचा छंद होता.