गुवाहाटी : दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट फेसबूकवर लिहणाऱ्या एका प्राध्यापकाला आसाममधील सिलचर येथे अटक करण्यात आली. सौरदीप सेनगुप्ता असे या या प्राध्यापकाचे नाव आहे. गुरूचरण महाविद्यालयात शिकवणाऱ्या या प्राध्यापकाला त्याच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात एका विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली होती, असे पोलिसांनी सांगितले.
आपल्या फेसबुक पोस्टवर ते एका विशिष्ट समाजाला लक्ष्य बनवत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. नंतर त्यांच्या कुटुंबियांनी ही पोस्ट डिलीट केली. या टीपण्णीब्द्दल माफी मागणारी पोस्ट त्याने केली. सेनगुप्तावर धार्मिक भावना दुखावणे, दोन गटांत वैमनस्य निर्माण करणे यांसह अन्य कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
तत्पुर्वी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात निदर्शने केली. सेनगुप्ता यांना त्यांना तातडीने निलबित करण्यात आले. त्यांच्या घरात घुसून विद्यार्थ्यांच्या एका गटाने शुक्रवारी सायंकाळी त्यांना शिविगाळ केली होती, त्याच गटाकडून त्यांना लक्ष्य बनवण्यात येत आहे. ही अटक होण्यापुर्वी गुन्हा नोंदवल्याची आपणास माहिती नव्हती, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.