टोकियो : जपानचे सम्राट नारुहितो यांचे छोटे बंधू एकीशीनो यांना जपानचे राजपुत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे सम्राट नारुहितो यांनी रविवारी झालेल्या एका शानदार समारंभात एकीशीनो यांच्याकडे राजेशाही तलवार प्रदान करून त्यांच्या राजपुत्र होण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
गेल्या सात महिन्यांपासून करोना महासंकट यामुळे हा कार्यक्रम सतत लांबणीवर पडत होता. अखेर रविवारी राजमहालात झालेल्या कार्यक्रमात कुणीही एकीशीनो उर्फ फुमिहोतो यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
गेल्यावर्षी सम्राट अकिहितो यांनी आपला मोठा मुलगा नारुहितो यांना सम्राट पद बहाल केलं होतं. त्यानंतर नारुहितो यांचे छोटे बंधू एकीशीनो त्यांना राजपुत्र करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. पण हा कार्यक्रम सतत लांबणीवर पडत होता. अखेर रविवारी आपल्या छोट्या बंधूला प्रिन्स अर्थात राजपुत्र म्हणून जाहीर करताना सम्राट नारुहितो म्हणाले आजपासून माझे छोटे बंधू एकीशीनो हे जपानचे युवराज असतील गेल्या वर्षी जेव्हा नारीहीतो सम्राट पदावर विराजमान झाले होते. त्यानंतर त्यांचे वारसदार म्हणून यादीमध्ये केवळ दोनच नावे होती एक म्हणजे त्यांचे बंधू एकीशीनो आणि दुसरे नाव म्हणजे सम्राटांचा मुलगा 14 वर्षीय हिनोशितो याचे होते.
एकीशीनो यांना दोन मुली आहेत पण जपानच्या कायद्याप्रमाणे जपानमध्ये महिला राज्याच्या वारसदार बनू शकत नाही किंवा सम्राट बनू शकत नाहीत. विद्यमान सम्राटांचा मुलगा लहान असल्याने आपले धाकटे बंधू एकीशीनो यांना युवराजपद बहाल केले आहे