अकोला – महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात भाजप आमदाराला लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका ऑटोरिक्षा चालकाला अटक केली आहे. अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील भाजपचे आमदार वसंत खंडेलवाल हे त्यांच्या कारमधून घरी जात असताना रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आमदार वसंत खंडेलवाल पश्चिम विदर्भातील मोठे सराफा व्यावसायिक आहेत. ते गांधी रोडवरील आपल्या सराफा दुकानातून खंडेलवाल भवनामागील आपल्या घरी सोने खरेदी-विक्रीची रक्कम घेऊन जात असताना हा प्रकार घडला आहे.
खंडेलवाल, ज्यांचे दागिन्यांचे दुकान आहे, ते त्यांच्यासोबत रोख रक्कम घेऊन जात होते, तेव्हा ऑटोरिक्षामधील आरोपींनी रिक्षा मध्ये घालून त्यांची कार अडवली,त्यानंतर झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपींनी आमदारांचा मोबाईल हिसकाऊन घेतला.
या प्रकरणात स्थानिक नागरीक आमदारांच्या मदतीला धावल्यानतर आरोपींनी मोबाईल तेथेच टाकून पळ काढला. पण नंतर त्यांच्यातील एकाला अटक करण्यात आली. आमदारांकडील पैसे व इतर माल लुटण्याचाच त्यांचा इरादा होता असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.