मुंबई – बहुरंगी व्यक्तिरेखा एकाच वेळेस साकारण्यासाठी अभिनेता अनुपम खेर ओळखला जातो. अनुपम खेर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो तो नेहमी हव्या त्या गोष्टींवर व्यक्त होताना दिसतो. मग तो कधी विदेशातील टॅक्सी ड्राइव्हरसोबत संवाद साधतो तर कधी आपल्या आईसोबतचा घरातील व्हिडीओ शेअर करतो. दरम्यान, आता पुन्हा एकदा अनुपम खेर यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, त्यांची ही पोस्ट त्यांच्या चाहत्यांना चिंतेत पडणारी आहे.
अभिनेता अनुपम खेर लवकरच आपल्या आगामी ‘विजय 69’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच त्यांना गंभीर दुखापत झाल्याचं दिसून येत आहे. स्वतः अनुपम यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ‘विजय 69’ चित्रपटाचे शूटिंग करताना त्यांना ही दुखापत झाली आहे.अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या हाताला ब्लॅक कलरची स्लिंग लावलेली दिसत आहे.
View this post on Instagram
या फोटोला अनुपम यांनी कॅप्शन दिलं, “तुम्ही स्पोर्ट्स फिल्म करता आणि तुम्हाला दुखापत होणार नाही, असे कसे शक्य होईल? काल विजय 69 च्या शुटींग दरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. हे वेदनादायक आहे, पण खांद्यावर स्लिंग लावणाऱ्या भावाने जेव्हा सांगितले की, त्याने शाहरुख आणि हृतिक यांच्या खांद्याला पण हे स्लिंग लावले होते, तेव्हा वेदना कमी झाल्या. पण जर मला थोडा जोरात खोकला आला तर नक्कीच वेदना होतात.! असं देखील त्यांनी म्हंटलं आहे.