नवी दिल्ली – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच गरम झालं आहे. त्यातच भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी समाजवादी पक्षासोबत युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर चंद्रशेखर आझाद यांना अश्रू अनावर झाले. एसबीएसपीचे अध्यक्ष ओपी राजभर यावेळी तिथे उपस्थित होते. चंद्रशेखर यांना सावरत ओपी राजभरही यावेळी भावूक झाले होते.
चंद्रशेखर म्हणाले की, अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत आमच्या पक्षाची युती झाली तर याचा फायदा बहुजन समाजाला अधिक होईल. यावर ओपी राजभर म्हणाले, चंद्रअशेखर आझाद यांचे दुःख स्वाभाविक आहे. मी ते समजू शकतो. भाजप ज्या प्रकारे देशातून मागासवर्गीयांचे आरक्षण संपवत आहे. त्यामुळे जे समाजाचे शुभचिंतक आहेत ते दुखी आहेत.
यावेळी ओमप्रकाश राजभर यांनी भावूक झालेल्या आझाद यांचे रुमालाने डोळे पुसले. तर आझाद म्हणाले, राजभर माझे भाऊ आहेत. ते माझ्या यातना समजू शकतात. आमचा हाच प्रयत्न असेल की एक मजबूत गठबंधन होवो. तसेच मी प्रामाणिक आहे. राजभर एकदा म्हणाले की, मी कोणाला धोका दिला तर मी सगळं सोडून निघून जाईल.
दरम्यान आझाद यांच्या या विधानावर राजभर देखील भावुक झाले होते. आपण युतीसंदर्भात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करू असं आश्वासनही त्यांनी दिलं.