अजित पवारांची मिश्‍किल टोलेबाजीवर मुख्यमंत्र्याच सडेतोड उत्तर

मुंबई – ‘मंत्र्यांना मागे बसवलंय…प्रश्न विचारताना स्वत: च्या जागेवरून प्रश्न विचारा,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत संताप व्यक्त केला. सुनिल प्रभू यांनी मंत्री अशोक उईके यांच्या जागेवरून प्रश्न विचारला होता. त्यावर अजित पवारांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान टीका केली. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवाराना उत्तर दिलं आहे. ‘अजितदादांना सुनिल प्रभू आणि आशिष शेलार यांना एकमेकांशेजारी बसल्याचं बघायचं नाही,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

तत्पूर्वी, मुंबईत पावसाळी अधिवेशनाचा सोमवारी  पहिला दिवस विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडला. विरोधी पक्षनेते पदासाठी कॉंग्रेसने दावा केल्यानंतर गृहनिर्माणमंत्री म्हणून सत्ताधारी बाकावर बसलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांना पाहून विधानसभेत राजकीय टोलेबाजी रंगली होती. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता आमचा तिसरा विरोधी पक्षनेताही पळवू नका, अशी मिश्‍कील टिप्पणी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.