का होत आहे ‘हा’ फोटो व्हायरल?

श्रीनगर – जम्मू-काश्मिरस्थित अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. यामधील शहीद इंस्पेक्टर अरशद खान यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी  एसएसपी हसीब मुगल यांना अरशद यांच्या चार वर्षीय मुलाला कडेवर घेऊन रडू कोसळले. याप्रसंगीचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अनंतनागचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अरशद खान दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू असताना बुलेट प्रूफ व्हॅनमधून घटनास्थळी पोहचले. व्हॅनमधून बाहेर पडताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. रविवारी अरशद खान यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. खान यांचा मृतदेह सोमवारी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. खान यांच्या चार वर्षीय उहबानला कोणतीही माहिती नव्हती. तर उहबानचा लहान भाऊ १८ महिन्यांचा आहे. उहबान एवढ्या लहान वयातही मोठ्या मुलाचे कर्तव्य निभावत होता. एक पोलीस अधिकारी हात पकडून उहबानला ताबूतजवळ घेऊन जातात व तो पुष्पांजली अर्पण करतो. यादरम्यान पोलीस अधिकाऱ्याला अश्रू अनावर झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)