अशोक पवार यांच्या प्रचारार्थ आज सभा घेणार
न्हावरे- शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. अशोक पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी (दि. 16) दुपारी 2 वाजता मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे सभा होणार आहे, अशी माहिती शिरुर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र काळे यांनी दिली.
याप्रसंगी अजित पवार मतदारसंघातील पक्षांतर केलेल्या नेत्यांवर तोफ डागणार का? याबाबत पवार काय बोलतात.याकडे शिरुर-हवेली तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. यावेळी शिरुर-हवेली मतदार संघातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.