राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटून शिंदे फडणीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदी विराजमान झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर आज पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले अजित पवार यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांची ही पहिलीच बारामती भेट असल्याने आज कार्यकर्ते, नागरिक, व्यापारी, संस्था व संघटनांच्या पदाधिका-यांनी त्यांचे हार, बुके देत व फुलांची उधळण करत स्वागत केले.जेसीबीच्या मदतीने अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची उधळण केली गेली. क्रेनद्वारेही त्यांना हार घातले गेले. दरम्यान अजित पवार यांची शहराच्या मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली यावेळी शहरात ठिकठिकाणी अजित पवार यांच्या समर्थनार्थ स्वागत कमानी,फलक लावण्यात आले होते