Ajit Pawar on Politics । राज्यातील राजकारण सध्या निवडणुकांमुळे चांगलेच तबल्याचे दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवारांचा आजचा इंदापूर दौरा महत्वाचा मानला जातोय. आज अजित पवार इंदापुरात शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. मात्र त्यांच्या एका वाक्याने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले.
मी कामाचा माणूस Ajit Pawar on Politics ।
शिरूर तालुक्यात काही राजकीय घटना घडल्या तिथल्या लोक प्रतिनिधी यांनी धरसोड भूमिका घेतली त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांनी आज पक्षात प्रवेश केल्याचे ते म्हणाले. सोबतच मी कामाचा माणूस आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
अजित पवार काय म्हणाले? Ajit Pawar on Politics ।
अजित पवार काय म्हणाले की, “इंदापूरच नाही तर पुणे जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून सगळे काम करतो. त्यात सगळी काम होणार याची खात्री करुन घेतो. कामे कशी करायची मला माहित आहे, कारण अंडी पिल्लं आपल्याला माहीत आहे. “असेही त्यांनी म्हटले.
40 कोटींचा पुणे जिल्ह्याच्या विकास आराखडा आज 1250 कोटींवर गेला. महाराष्ट्रमध्ये गेलो तर काय चांगलं आहे ते आपल्या भागात आणायचं कसं याचा विचार करतो, मी कामाचा माणूस आहे.