Ajit Pawar : गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक कार्यक्रमांत गैरहजर असल्याने पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र यामागचे कारण आता समोर आले आहे. अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची ट्विटद्वारे दिली आहे.
अजित पवार यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाल्याने त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर अजित पवार पुन्हा कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
Contrary to speculative media reports suggesting that Shri Ajit Pawar is not attending public events, I would like to clarify that he has been diagnosed with dengue since yesterday and has been advised medical guidance and rest for the next few days. Shri Ajit Pawar remains…
— Praful Patel (@praful_patel) October 29, 2023
दरम्यान, अजित पवार काल बारामतीत माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला आले नव्हते. मराठा आंदोलकांनी विरोध केल्याने अजित पवारांनी कार्यक्रम टाळल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र अजित पवारांना डेंग्यू झाल्याने ते कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत असं प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे.