सहकार्य हेतुम् कार्य सफलताम्…’ या वाक्याचा बोध घेऊन नारायणगावातील युवकांनी एकत्र येऊन फंडरूपाने अजिंक्य-स्पोर्टस क्लबच्या माध्यमातून अजिंक्यतारा नागरी पतसंस्थेची स्थापना 6 एप्रिल 2008 साली माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे संस्थापकीय सल्लागार शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोलजी कोल्हे यांच्या सहकार्याने तसेच संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष गणेशजी वाजगे यांच्या पुढाकाराने करण्यात आली.
“ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही’, हे तत्त्व आत्मसात करून कार्यरत असलेल्या “अजिंक्यतारा’ नागरी सहकारी पतसंस्था म्हणजेच जुन्नर तालुका सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था. अर्थव्यवस्थेतील चढउतार, नोटबंदी अशी अनेक आर्थिक आव्हाने समोर असतानाही ही संस्था तालुक्यातील सहकार क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून उभी आहे. सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार आणि हितचिंतक यांचा सार्थ विश्वास आणि जिव्हाळा यांच्यामुळे संस्थेचा कारभार पारदर्शक व प्रगतीपथावर आहे. तत्परता, सचोटी, व्यवहार जपण्याबरोबर माणसे जपण्याचे धोरण संचालक मंडळ तसेच कर्मचारी वर्ग जपत आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने एक पाउल म्हणुन कोअर बॅंकिंग सुविधा सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. सभासदांसाठी राबविण्यात आलेली विमा संरक्षण पॉलिसी अंतर्गत आतापर्यंत चार सभासदांना त्याचा लाभ झाला आहे. संस्थेच्या आतापर्यंतच्या ठेवी 11 कोटी, कर्ज 9 कोटी असून एकूण व्यवसाय 20 कोटीपर्यंत पोहोचला आहे.
सहकार क्षेत्रात दिवसेंदिवस येणारे कायदा व निकष यांची अंमलबजावणी संस्थेच्या होणारे ऑडिटच्या माध्यमातून तंतोतंत पालन करून त्यामध्ये संस्थेला स्थापनेपासून सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. तसेच होणाऱ्या आर्थिक वर्षातील नफ्याची कायदेशीर विभागणीमधून सर्व प्रकारच्या तरतुदी करून उरलेल्या नफा सभासदांना लाभांश रूपाने दिला जातो.
पुरस्कार व मानसन्मान
सातत्याने 100 टक्के कर्ज वसुली व उकृष्ट अहवाल केल्याबदद्ल जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीने “सहकार पुरस्कार’ देण्यात आला आहे. तसेच वर्ष 2018-2019 चा सहाय्यक निबंधक जुन्नर कार्यालयाकडून “सहकारत्न’ पुरस्कार देऊन संस्थेला गौरविण्यात आले आहे. अजिंक्य स्पोर्टस क्लब व संस्था यांच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षात सामाजिक बांधिलकी या नात्याने विविध क्षेत्रातील सामाजिक उपक्रम राबवित असताना मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर, दिनदर्शिका, वृक्षारोपण, दृष्काळग्रस्त छावणीस चारा वाटप तसेच जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना विविध माध्यमातून पाण्याची टाकी, वॉटर फिल्टर, शालेय उपयोगी वस्तू एलईडी टेलिव्हिजन सेट इत्यादी प्रकारच्या गरजेच्या वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप व कुपोषित बालकांसाठी आरोग्य शिबीर राबविण्यात आले आहे.
अशा आहेत सुविधा :
- सोनेतारण कर्ज प वाहनतारण कर्ज
- गृहतारण कर्ज प आरटीजीएस
- एनईएफटीप वीजबिल भरणा
- डिमांड ड्राफ्टप विमा संरक्षण
(शब्दांकन : सचिव, अतुल आहेर)