बारामती, (प्रतिनिधी)- सोरटेवाडी (ता. बारामती) येथील अजिंक्य शरद सोरटे या तरुणाची महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षण नामतालिकेवर नुकतीच शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अजिक्य सोरटे हे बारामतीतील सोरटेवाडी गावचे रहिवाशी असून त्यांचे अजिंक्य सोरटे अँन्ड असोसिएटस् या नावाने त्यांची टॅक्स कन्सल्टंसी फर्म आहे. अजिंक्य सोरटे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सोरटेवाडी येथील माध्यमिक विद्यालय सोरेटेवाडी येथून पूर्ण झाले असून मु. सा. काकडे महाविदयालय सोमेश्वरनगर येथून एमकॅाम पूर्ण केले आहे. तसेच राज्य शासनाच्या सहकार विभागाची जीडीसी ॲन्ड ए परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत. या यशाबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.