बारामती, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शासनाच्या भारत स्काऊट आणि गाईड संस्थेतर्फे राज्यस्तरावर राज्य पुरस्कार परीक्षा तीन दिवसीय शिबिर रामबाग येथील राज्य प्रशिक्षण केंद्रात आयोजित केले होते. परीक्षेत पुणे, सोलापूर व अहमदनगर या जिल्ह्यांमधून एकूण २७७ विद्यार्थी यशस्वी झाले. यामध्ये ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे एकूण १६ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होऊन राज्य पुरस्कार प्राप्त केला.
यामध्ये संस्कार अमोल झगडे, सुजल जालिंदर जाधव, करण सोमनाथ काळे, संकल्प दिलीप शेळके, अथर्व दत्तात्रय खरात, साहिल धनाजी झारगड, आदित्य दीपक काशीद, प्रवीण महेश दराडे, रामहरी नवनाथ मोहळकर, भीमशंकर विश्वनाथ भंडारी, राज राम भंडगे, संस्कृती सुनील कुटे, श्रेया नितीन कांबळे, तनुजा किशोर घोरपडे, सायली अर्जुन शिंगटे, अश्विनी लालासो आटोळे या सर्व पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्ञानसागर गुरुकुलमधील एकूण ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक प्रा. दिलीप नेवसे, सुधीर सोनवणे व शमा शिकिलकर यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर आटोळे, सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, दीपक सांगळे, पल्लवी सांगळे, दीपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, सुधीर सोनवणे, नीलिमा देवकाते, राधा नाळे, नीलम जगताप, रिनाज शेख यांनी केले.