जगभरात कहर माजविणा-या करोना व्हायरसवर सलमान खाननंतर आता बॉलीवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगण याचे “ठहर जा’ हे गाणे रिलीज झाले आहे. या व्हिडिओ सॉन्गला अतिशय सुंदरपणे रचले गेले आहे. या माध्यमातून लॉकडाऊनच्या या कठीण काळात लोकांना घरीच राहण्याचा संदेश अजय देवगण याने दिला आहे.
या गाण्याला स्वतः अजय देवगनने प्रोड्यूस केले आहे. हे गीत अनिल वर्मा यांनी लिहिले असून मेहुल व्यास यांनी आपला सुमधूर आवाज दिला आहे. हे व्हिडिओ सॉन्ग अजय देवगनवर चित्रित करण्यात आले आहे. तसेच करोना व्हायरसमुळे देशात निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीत लोक एकमेकांना कशी मदत करत आहेत, हे या गाण्यातून दाखविण्यात आले आहे.
डॉक्टर आणि पोलीस रात्रंदिवस लोकांची सेवा करण्यात व्यस्त आहेत. गाण्याच्या सुरुवातीस “खूब थका तू अपनों की वजह, अपनों के लिए तू ठहर जा।’, असे अजय देवगण गुणगुणत असताना दिसतो.
दरम्यान, अजयच्या आधी सलमान खानने करोना व्हायरसवर एक गाणे रिलीज केले होते. हे गाणे स्वतः सलमानने लिहिले व गायले होते. करोनाविरुद्धच्या युद्धात बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही सरकार आणि लोकांना खूप मदत करत आहेत.