अजय देवगण “मैदान’ मारणार

“तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता अजय देवगनने आपला मोर्चा “मैदाना’कडे वळवळा आहे. येत्या काही दिवसांमध्ये तो मैदानात खेळताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव “मैदान’ असे आहे. चित्रपटाचे काही पोस्टर चाहत्यांच्या भेटीस आले आहेत. याआधी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटांचे टीझर आणि पोस्टर चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.

चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये अजय हातात बॉल पकडून उभा होता तर दुसऱ्या पोस्टरमध्ये तो बॉल किक करताना दिसत आहे. पोस्टरमध्ये त्याने डेनिम शर्ट आणि ट्राउजर घातले आहे. खुद्द अजयने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पोस्टर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये “बदलाव हवा असेल तर फक्त एक व्यक्ती देखील पुरेसा आहे.’ असे लिहिले आहे.

दरम्यान, या चित्रपटाची कथा 1956 ते 1962 सालातील भारतील फुटबॉल संघ आणि त्यांचे कोच यांच्या भोवती फिरताना दिसणार आहे. तेव्हाचा काळ फुटबॉलसाठी सोनेरी दिवसांचा होता. मेलबर्न ऑलिम्पिकमधील अनेक बड्या संघांना हरवून 1956मध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम होते. कर्करोगाशी दोनहात करत त्यांनी 1962 मध्ये आशियाई स्पर्धेत संघाला सुवर्णपदक दिले. “मैदान’या चित्रपटामध्ये अजय सय्यद अब्दुल रहीम यांच्या भूमिकेला न्याय देणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.