Air India : काही दिवसांपूर्वी एअर इंडियाचे मालकी हक्क टाटा समूहाकडे गेल्यापासून कंपनीत अनेक नवीन बदल करण्यात येत आहेत. त्यातच आता त्यांच्या नवीन A350 विमानाचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला आहे, त्यांच्या नवीन विमानाचा लूकचा हा त्यांनी नव्याने तयार केलेल्या पोषाखाशी मिळताजुळता आहे.
एअरलाइनने वर्षाच्या सुरुवातीला नवीन लाल-वांगणी-गोल्ड लुक आणि नवीन लोगो ‘द व्हिस्टा’सह स्वतःला रीब्रँड केले होते. त्यानुसारआता A350 चा नवीन लूकचा पहिला फोटो फ्रान्समधील टूलूस त्याठिकाणच्या कार्यशाळेत घेण्यात आला आहे. नवीन रंगातील ही विमाने हिवाळ्यात भारतात येणार असल्याचे एअरलाइन्सकडून सांगण्यात येत आहे.
एअर इंडियाने याविषयी ट्विटरवर एक पोस्ट केली असून त्यात, “आमच्या टुलुस, फ्रान्समधील नवीन लिव्हरीमध्ये हे भव्य A350 चे पहिले स्वरूप आहे. “आमचे A350s या हिवाळ्यात मायदेशी येणायचे प्रयत्न सुरु आहेत” तसेच विमानाच्या नवीन लूकसाठी तब्बल 400 दशलक्ष इतकी मोठी रक्कम खर्च केली जात असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
Here's the first look of the majestic A350 in our new livery at the paint shop in Toulouse. Our A350s start coming home this winter… @Airbus #FlyAI #AirIndia #NewFleet #Airbus350 pic.twitter.com/nGe3hIExsx
— Air India (@airindia) October 6, 2023
एअर इंडियाने यापूर्वी सांगितले होते की त्यांचा नवीन लोगो ‘द व्हिस्टा’ गोल्ड विंडो फ्रेमपासून प्रेरित आहे. विमान कंपनी आपला वैभवशाली वारसा जपत स्वतःचा कायापालट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन लिव्हरी आणि डिझाइनमध्ये गडद लाल, ऑबाजिर्ण आणि गोल्ड हायलाइट्सचे पॅलेट तसेच चक्र-प्रेरित नमुना आहे.
कंपनीच्या नवीन लोगो आणि लिव्हरीमध्ये सोनेरी, लाल आणि जांभळ्या रंगांचा समावेश आहे, जो टाटाच्या अन्य विमान विस्ताराची आठवण करून देतो. रीब्रँडिंग प्रक्रियेचा एक भाग म्हणून, एअर इंडियाच्या सर्व विमानांचे अंतर्गत भाग देखील पुन्हा डिझाइन केले गेले आहेत.