Hamas Israel : पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी हमासने इस्रायलच्या दिशेने सुमारे 5,000 रॉकेट डागले. यानंतर इस्रायलने हमासविरोधात युद्धाची घोषणा केली. इस्रायलने पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीच्या सीमेला लागून असलेल्या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरात राहण्यास सांगितले. देशाच्या बहुतांश भागात सायरनचे आवाज ऐकू येत आहे.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलवरील हल्ल्यानंतर हमास प्रमुख मोहम्मद दाईफ म्हणाले की, ‘पुरे झाले आहे. इस्रायली कब्जाने आमच्या नागरिकांचे शेकडो हत्याकांड केले. त्यांचा छळ करा. आम्ही शत्रूंना आधीच सावध केले होते, पण त्यांनी ऐकले नाही. आता आम्ही ते सहन करणार नाही…’ हमासने इस्रायलविरुद्धच्या कारवाईला ‘अल अक्सा स्टॉर्म’ असे नाव दिले आहे.
इस्रायलशी वैर असलेली हमास ही पॅलेस्टाईनची इस्लामिक अतिरेकी संघटना आहे. शेख अहमद यासीन यांनी 1987 च्या जनआंदोलनात या संघटनेची पायाभरणी केली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत हमास इस्रायलला पॅलेस्टिनी भागातून हटवण्यासाठी झगडत आहे. गाझा पट्टीतून काम करणाऱ्या हमासला इस्रायल हा देश म्हणून मान्यता नाही आणि या संपूर्ण भागात इस्लामिक राज्य स्थापन करायचे आहे.
2000 साली दुसऱ्या गटाचा पाया घातला गेला. त्याच्या स्थापनेपासून, इस्रायलवरील हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. विशेषत: आत्मघातकी हल्ले अनेक पटींनी वाढले आहेत.
हमासकडे ( Hamas ) किती सैनिक आहे ?
हमास संघटनेत किती लढवय्ये आहे, याचा नेमका अंदाज नाही. पण अलीकडच्या काळात हमासच्या रॅलीत हजारो लोक जमा होत आहेत. विशेषतः तरुणांची संख्या बरीच मोठी आहे. काही अहवालांमध्ये हमासच्या लढवय्यांची संख्या 50 हजारांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. हमासमधील अंतर्गत कलहाच्याही चर्चा चव्हाट्यावर येत आहेत. विशेषत: 1996 साली जेव्हा हमासने इस्रायलमध्ये एकापाठोपाठ एक अनेक बॉम्बस्फोट घडवून आणले आणि 60 इस्रायली नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तेव्हा एका वर्गाने त्याला विरोध केला. परंतु सशस्त्र संघर्ष आवश्यक असल्याचे मत दुसऱ्या गटाने मांडले.
हमास ( Hamas ) किती शक्तिशाली आहे?
इस्रायली सैन्याच्या तुलनेत हमास कमकुवत दिसत असला तरी त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, हमास रॉकेटपासून मोर्टार आणि ड्रोन हल्ल्यांपर्यंतच्या क्षमतेने सुसज्ज आहे. हमासच्या एलिट युनिट्स देखील कॉर्नेट मार्गदर्शित अँटी-टँक क्षेपणास्त्रांचा वापर करताना दिसल्या आहेत. ही संघटना गाझा पट्टीतच बहुतांश शस्त्रे बनवते. हमासला इराणकडून शस्त्रे बनवण्याचे तंत्रज्ञान मिळाल्याचा दावा इस्रायल सातत्याने करत आहे.
कोण देतो हमासला ( Hamas ) निधी ?
सर्व इस्लामिक देश हमासला निधी देतात, असा इस्रायलचा दावा आहे. सर्वात मोठे नाव कतार आहे. अहवालानुसार, एकट्या कतारने हमासला 1.8 अब्ज डॉलरहून अधिक मदत दिली आहे. हमासचे जगभरात समर्थक आहेत, आणि त्यांना चांगली रक्कम दानही दिली जाते.