कराड – मराठा समाजाचे क्रांतिसूर्य मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर उद्या (शुक्रवार, दि. 17) सायंकाळी सात वाजता होणार आहे. त्यासंदर्भात पोलीस प्रशासन आणि मराठा समन्वयकांची बैठक नुकतीच झाली. त्यानुसार सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येत आल्या असून, सभेची तयारी पूर्णत्वाकडे आली आहे.
मराठा समाजातील आबावलवृद्धांशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे-पाटील हे कराडला येत आहेत. त्यांच्या सभेसाठी कराड, पाटण, सातारा, खटाव, कडेगाव, शिराळा आदी. तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत. त्याचा विचार करुन नुकतीच पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांच्याशी मराठा समन्वयकांची बैठक झाली. त्यामध्ये सुरक्षा, पार्किंग व अन्य वाहतुकीच्या विषयासंदर्भात चर्चा झाली. दरम्यान, सभेसाठी गावोगावी जनजागृतीसाठी बैठका घेण्यात आल्या असून या सभेसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित राहणार असल्याचे मराठा समन्वयकांनी यावेळी सांगितले.
…अशी असेल सभेसाठी पार्किंग व्यवस्था
सुरक्षेच्या दृष्टीने साई मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम दक्षिण गेट रस्ता, विजय दिवस चौक ते बदियानी बंगला हा नो-पार्किंग झोन’ राहील.
वडगाव-कार्वे-वाठारकडून येणाऱ्या वाहनांसाठी
उर्दू शाळा मैदान परिसर, बैल बाजार, मार्केट ग्राउंड परिसर, कल्याणी मैदान मार्केट येथे चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था असेल.
उंडाळे-विंगकडून येणाऱ्या वाहनांसाठी
पी. डी. पाटील उद्यान परिसर, मार्केट यार्ड, वॉटर सप्लाय ऑफिस परिसर, पंकज लॉन शेजारी चारचाकी वाहन पार्किंग.
मसूर, ओगलेवाडीकडून येणाऱ्यांसाठी
नलवडे घर ते राम मंदिर, गुजर घर ते राम मंदिर, कॉटेज हॉस्पिटल भिंत दुचाकी वाहनांसाठी पार्किंग, एल. सी. शहा पारस बंगला ते कॉटेज हॉस्पिटल भिंत परिसर, विरुंगळा
बंगला ते एलआयसी ऑफिस दोन्ही बाजूंना, विरंगुळा बंगला ते दिलीप जाधव बंगला दोन्ही बाजूंना, शिवाजी हायस्कूल येथे चारचाकी वाहनांसाठी पार्किंग, विठामाता हायस्कूल दुचाकी वाहनांसाठी पार्किंग, आंबेडकर ग्राउंड बुधवार पेठ चारचाकी वाहन पार्किंग, श्री हॉस्पिटलसमोर चारचाकी वाहन पार्किंग (ट्रक, ट्रॅक्टर आदी मोठी वाहने) आणि वाखाण भागातील अंतर्गत रस्ते चारचाकी पार्किंग.
उंब्रज-वारुंजीकडून येणाऱ्या वाहनांसाठी
लाहोटी मैदान, पंकज लॉनशेजारी, दैत्य निवारणी मंदिर परिसर, साई मंदिर, शिवतीर्थ दत्त चौक परिसरात चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असेल.