नगर – दिवाळी अवघ्या 6 दिवसांवर आली आहे, त्यामुळे दिवाळी साहित्य, दिवाळीसाठीचे नवे कपडे खरेदी करण्यासाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. किराणा, इलेक्ट्रिकल्स, सोने चांदीसह बाजारही मोठ्या प्रमाणावर फुलला आहे.अनेक ठिकाणी रांगोळीच्या दुकाने थाटल्या आहेत.
येत्या 10 नोव्हेंबरपासून दिवाळीचा सण सगळीकडे साजरा केला जाणार आहे. पाच दिवस दिवाळी सण साजरा करण्यात येतो. ग्राहकांची देखील विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात लगबग पाहायला मिळते. ठिकठिकाणी बाजारात फटाक्यांची दुकानं पाहायला मिळतायत. त्याचप्रमाणे नगर-मधील प्रसिद्ध असलेल्या कापड बाजारमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तसेच दिवाळीला यावर्षी मराठा आरक्षणाचा फटका बसला बस बंद असल्यामुळे खेड्यातील नागरिकांना खरेदीसाठी येण्यास मोठी तारांबळ उडाली. आता कुठे बस चालू झाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
महागाई वाढली,यंदा मराठा आरक्षणामुळे गावाकडून यायची सोय नसल्यामुळे अवघड झाले.आता बस चालू झाल्यामुळे पुन्हा सगळे सुरळीत झाले. पुरेसा पाऊस नसल्यामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले.
प्रकाश ठाणगे, ग्राहक
दरवेळेस पेक्षा दिवाळी वातावरण काही दिवस शांत होते. परंतु जसजशी दिवाळी जवळ येते नागरिकांमध्ये उत्साह दिसून येतो. मोठ्या प्रमाणावर मराठा आरक्षण फटका बसला आहे. खेड्यातील नागरिक खरेदीसाठी येत नाही बस अनेक दिवस बंद होत्या.
अमित भूमकर, व्यापारी