नवी दिल्ली – भारत-मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉरच्या सक्षमीकरण आणि परिचालन सहकार्यासाठी करण्यात आलेल्या कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली.
भारत सरकार आणि संयुक्त अरब अमिराती सरकार यांच्यातील उच्चस्तरीय भेटीदरम्यान स्वाक्षरी केलेल्या आंतर-सरकारी आराखड्याचा हा करार करण्यात आला आहे.
द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करणे आणि बंदरे, सागरी आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करणे हे आयजीएफए चे उद्दिष्ट आहे.
आयएमईसी च्या विकासाच्या संदर्भात भविष्यातील संयुक्त गुंतवणुकीच्या आणि सहयोगाच्या आणखी संधींचा धांडोळा घेण्याच्या उद्देशाने उभय देशांमधील सहकार्याच्या क्षेत्रांचा आयजीएफए मध्ये समावेश आहे.
या करारामध्ये दोन्ही देशांमधील सहकार्याबाबतचा विस्तृत आराखडा आहे. हे सहकार्य देशांच्या अधिकारक्षेत्रातील संबंधित नियम आणि नियमनाशी सुसंगत तत्त्वे, मार्गदर्शक तत्त्वे आणि करारांवर परस्पर सहमत असलेल्या संचावर आधारित असेल.