पुणे – राज्यभरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या आणि मागील चार वर्षांपासून फरार असलेल्या नेपाळी शिवा एजंटला अटक करण्यात आले आहे. खंडणी विरोधी पथकाने त्याला गुजरातमधील सुरतमधून ताब्यात घेतले.
शिवा एजन्ट उर्फ शिवा रामकुमार चौधरी (37 , रा. नेपाळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पुणे शहरात सेक्स रॅकेट चालविल्याप्रकरणी शिवाच्या टोळीविरूद्ध 2017 मध्ये मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर नेपाळी शिवा फरार झाला होता.
तो मागील 15 दिवसापून सुरत शहरात त्याच्या मित्राकडे आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शखाली खंडणी विरोधी पथक गुजरातमध्ये गेले होते. त्यांनी सुरत गुन्हे शाखेच्या मदतीने नेपाळी शिवाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड , पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अमंलदार प्रदीप शितोळे, प्रवीण पडवळ, बापू भोसले, विजय गुरव, संपत अवचरे, विनोद साळुंके, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, अमोल पिलाने, प्रदीप गाडे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, मोहन एलपल्ले, चेतन शिरोळकर, काशीनाथ परदेशी, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांनी केली.