पुन्हा सर्वोच्च पातळीच्या जवळ

परदेशी गुंतवणूकदार व परकीय गुंतवणूक संस्था यांच्या जोरदार खरेदीमुळं भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढून त्यांच्या सर्वोच्च पातळीजवळ जाण्याच्या बेतात स्थिरावले आहेत. सेन्सेक्सनं ३८६७२ तर निफ्टीनं ११६२३ पातळी गाठलीय. एकूणच बाजाराचा रोख हा उर्ध्व दिशेस वाटत असून निवडणूकीमधून अगदीच अनपेक्षित घडल्यासच बाजार कोलमडू शकतो. आता तरी तशी शक्यता बाजार गृहीत धरत नाहीय.

भारतीय बाजारातील परकीय गुंतवणूक रुपयाच्या विनिमयाचा दर हा ६९ रुपये प्रति डॉलरच्या आसपास ठेवण्यास हातभार लावत आहेत त्याचप्रमाणं कच्च्या तेलाच्या किंमती देखील मागील कांही दिवसांत भडकल्या नसल्यानं ती भीतीदेखील बाजारानं धुडकावलेली दिसतीय. निफ्टीसाठी पुढील उद्दिष्ट हे ११७०० असून निवडणुकीनंतर बाजाराच्या अपेक्षा पूर्ण करणारं सरकार आल्यास पुढील एक-दोन वर्षांसाठी निफ्टीचं उद्दिष्ट व्यापकपणे १३३९० हे राहील असं वाटतंय तर खालील बाजूस १११५० व १०६०० हे उत्तम आधार संभवतात. एकूणच वाहत्या प्रवाहात हात धुणं नेहमीच फायदेशीर ठरतं, असं इतिहास सांगतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here