काँग्रेसच्या ‘आयटी’ सेलवर फेसबुकची धाड! ६८७ फेसबुक पेजेस ‘ब्लॉक’

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच आज काँग्रेस पक्षाला मोठा दणका बसला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी फेसबुकने आपल्या सोशल मेडिया प्लॅटफॉर्मवर जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरविणाऱ्या पेजेसवर कारवाई करण्याचा धडाका लावला असून फेसबुकतर्फे आज काँग्रेस पक्षाच्या ‘आयटी’ सेलशी निगडित असणाऱ्या सुमारे ६८७ फेसबुक पेजेसवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

फेसबुकचे सायबर सेक्युरिटी प्रमुख नथॅनियल ग्लेशर यांनी या कारवाईबाबत माहिती दिली असून, लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक लक्षात घेऊन काँग्रेसशी संबंधित असणाऱ्या काही फेसबुक पेजेसवरून जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबाबत तसेच सत्ताधारी भाजप बाबत चुकीची माहिती पुरवली जात असल्याचे फेसबुकच्या लक्षात आल्याने फेसबुकतर्फे ही कारवाई करण्यात आली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.