नवी दिल्ली – तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे प्रसूतीदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. युट्यूबवरील विडिओ पाहून पतीने पत्नीची नैसर्गिक प्रसूती करून घेत असल्याचा आरोप केला जात आहे. यादरम्यान महिलेला खूप रक्तस्त्राव होऊन तिला जीव गमवावा लागला. ही घटना 22 ऑगस्टची आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रथिका यांनी सांगितले की, पोचमपल्लीजवळील पुलियामपट्टी येथील रहिवासी लोगनायकी (२७ वर्षे) नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसूती वेदना सुरू असताना लोगनायकी यांचे पती मधेश यांनी घरी नैसर्गिक प्रसूतीचा प्रयत्न केला. महिलेने मुलाला जन्म देताच, कथितरित्या नाभीसंबधीची दोरी योग्यरित्या कापली गेली नाही, ज्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाला आणि लॉगनायकी बेशुद्ध झाली.
घाईघाईत लॉगनायकी यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी सीआरपीसी कलम १७४ (अनैसर्गिक मृत्यू) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासात यूट्यूब पाहून डिलिव्हरी केल्याची बाब समोर आली आहे. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतर स्थिती स्पष्ट होईल. तपासात पोलिसांना पुरावे मिळाल्यास आरोपी पतीला अटक होऊ शकते, अशीही चर्चा आता परिसरात सुरु आहे,
पतीने यूट्यूब पाहून डिलिव्हरीची माहिती गोळा केली
पतीने यूट्यूबवर होम डिलिव्हरीची माहिती गोळा केल्याचे सांगण्यात येत आहे. अपूर्ण माहितीमुळे, प्रसूती यशस्वी होऊ शकली नाही आणि लोगनायकीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. एका आरोग्य कर्मचाऱ्याने माहिती दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि सांगितले की, महिलेचा होम डिलीव्हरीमुळे मृत्यू झाला आहे.