मुंंबई – बॉलिवूड गायक मिका सिंग त्याच्या गाण्यासाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या गाण्याची क्रेझ खासकरून तरुण वर्गात अधिक आहे. देशासह विदेशात देखील त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र मीका सिंग गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे माहिती समोर येत आहे. मिका सिंगचे जगभरात कॉन्सर्ट सुरू आहेत. मात्र परदेशात गेल्यानंतर त्याची तब्येत बिघडली आहे. घशात इंफेक्शन झाल्यामुळं मिका कॉन्सर्टमध्ये गाता येणे देखील शक्य झाले नाही. यामुळे त्याचे करोडो रुपयांचेही नुकसान झाले आहे.
काही दिवसांपासून सतत कॉन्सर्ट करत असल्याने त्याचा वाईट परिणाम त्याच्या आरोग्यावर झाला. याबाबत त्याने सांगितले की, माझ्या गळ्यातून आवाज निघत नाही. मी नेहमीच माझ्या आरोग्याबद्दल सतर्क असतो. पण अमेरिकेच्या दौऱ्यात मी फक्त शोवर लक्ष देत आरोग्याकडं दुर्लक्ष केले. येथे मी आराम न करता सलग शो करत गेलो. यामुळे माझी तब्येत बिघडली. असा प्रकार माझ्यासोबत पहिल्यांदाच घडला आहे. माझी तब्येत इतकी खराब झाली की, मला कॉन्सर्ट न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.”
याशिवाय पुढचे 25 तास डॉक्टरांनी त्याला प्रवास न करण्याचे सांगितलं आहे. त्यामुळे तो भारतात येऊ शकत नसल्याचेही त्याने सांगितले आहे. अचानक तब्येत बिघडल्यामुळे मिकाचे अनेक शो रद्द झाले. अनेक देशात त्याचे कॉन्सर्ट होते. पण सध्या काही कॉन्सर्ट रद्द करावे लागले आहेत. यामुळं त्याचे साधारण 10 ते 15 कोटींचे नुकसान झाल्याचं त्यानं सांगित[ले जात आहे. शोमध्ये परफॉर्म न केल्यानं तिकिटांचे पैसे प्रेक्षकांना परत केले आहेत. पण काही लोकांनी मला खूप सपोर्ट केल्याचेही मिकाने सांगितले आहे.