मुंबई – विराट कोहलीचे अफलातून शतक व कर्णधार फाफ डुप्लेसीची वादळी अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बंगळुरुने आयपीएल स्पर्धेत गुरुवारी सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. विशेष म्हणजे यावेळी विराट कोहली दमदार फॉर्मात आल्याचे पाहायला मिळाले. विराटाच्या या धुवाधार बॅटिंगबाबत स्वतः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भाष्य केले आहे.
हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना बंगळुरुच्या डावाची सुरुवात कर्णधार फाफ डुप्लेसी व विराट कोहली यांनी धडाक्यात केली. या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजीचा पालापाचोळा करताना वेगवान अर्धशतकी सलामी दिली.काल पुन्हा एकदा विराटचा झंजावात पाहायला मिळाला. सचिनने देखील विराटाच्या या इनिंगचे कौतुक केले आहे.
सचिनने विराटच्या या इनिंगचे कौतुक करत एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये सचिन म्हणतो,”विराट जेव्हा कव्हर ड्राइव्ह खेळला त्या पहिल्याच चेंडूपासून हा दिवस विराटचा असेल हे स्पष्ट झाले. विराट आणि फॅफ दोघेही पूर्ण फॉर्मात दिसत होते, त्यांनी अनेक मोठे शॉट्स खेळले पण त्याहीपेक्षा यशस्वी पार्टनरशिपसाठी उत्तम ताळमेळ दाखवला. दोघांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यासाठी १८६ ही मोठी धावसंख्या नव्हती.”
It was evident that this would be Virat’s day from the very first ball when he played that cover drive.
Virat and Faf both looked in total control, they not only played many big shots but also ran rather well between the wickets to build a successful partnership.
186 wasn’t a… pic.twitter.com/YpIFVroZfi
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 18, 2023
अशी केली फटकेबाजी
कोहली आणि डुप्लिसिस या जोडीनं हैद्राबादच्या बॉलर्सचा अक्षरशः किस काढला. कोहलीनं शतकासाठी सहा रन्स बाकी असताना दमदार षटकार ठोकला. मात्र त्यानंतर पुन्हा तसाच फटका मारण्याच्या नादात तो आउट झाला. विराटने 100 धावांच्या खेळीत 63 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 4 षटकार फटकावले आणि टीमच्या विजयात सिंहाचा वाटा निभावला.